गोपीनाथ मुंडे महामंडळ माझ्या हातून व्हावे ही तर नियतीची इच्छा… धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला!

0
478

Gopinath Munde Mahamandal…
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं हे महामंडळ सुरु होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यानाही हे महामंडळ निर्माण करता आलं नाही, असं धनंजय मुंडे म्हणत पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

माझ्या जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. माझा जन्म ऊसतोड मजुराच्या पोटी झालाय. माझा जीवनातला हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता हे प्रामाणिकपणे सांगतो.मागच्या सरकारच्या काळात मंडळ आलं गेलं. नाव जरी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं आहे तरी त्यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणं शक्य झालं नाही. त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही हे महामंडळ निर्माण करता आले नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे.