तुझ्यात जीव रंगला…लग्नाआधीच पाठक बाई व राणादा यांच्यात तू तू मैं मैं… व्हिडिओ

0
3750

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा झाला असून काही काळातच त्यांचं लग्नसुद्धा होणार आहे. पण लग्नाआधीच या कपलमध्ये जोरदार भांडण झाल्याचं दिसून आलं आहे.

हार्दिकने शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये पाठकबाई राणा दाची अगदी कॉलर पकडून खबर घेताना दिसत आहे. नितीश चव्हाण हा अभिनेता सुद्धा या खास फनी व्हिडिओचा भाग झाला आहे. या विनोदी व्हिडिओमध्ये हार्दिक नितीशशी बोलताना म्हणतो, “भाई, पितळ्याला घासून त्याचं कधी सोनं नाही बनत” त्यावर नितीश त्याला असं का विचारतो आहेस असा प्रश्न करतो त्यावर हार्दिक सांगतो, “यासाठी सांगतोय कारण माझी बायको ब्युटी पार्लरमध्ये गेलीये” असं म्हणत असतानाच अंजलीबाईंची एंट्री होते आणि अक्षया हार्दिकचा चांगला समाचार घेताना दिसते. लग्नाआधीच हार्दिकची कॉलर पकडून अक्षया दम देताना दिसत असल्याचं पाहून चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे.