Health Tips जेवणाला रुचकर बनवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. हिंगमध्ये अनेक औषधी गुण आहेत. अनेक आजारांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी फक्त एक चिमूटभर हिंग खाल्ल्याने तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. सकाळी याचे सेवन केल्याने पचनक्रिया तर सुधारतेच पण अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील दूर होतात. हिंग तुमची पचनसंस्था चांगली करते. पोट फुगण्याच्या किंवा गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर हिंगाचे सेवन नक्की करा. रिकाम्या पोटी हिंगाचे सेवन केल्याने सूज येणे आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.हिंगामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. खोकला, दमा आणि ब्रॉन्कायटिसच्या समस्यांपासून हिंग दूर ठेवते.