Thursday, May 9, 2024

तुम्ही दोन दिवस जेवू नका…आ. संतोष बांगर यांचा शाळेतल्या चिमुकल्यांना अजब सल्ला Video

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते वादात अडकले आहेत. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. बांगर विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, आमदार संतोष बांगर यांनी शाळेतल्या चिमुकल्यांना सांगितलं की, “तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका.” तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून वदवून घेतलं की, ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करायला लावणार?https://x.com/RRPSpeaks/status/1756177295029481695?s=20

संतोष बांगर शाळेतल्या चिमुकल्यांना म्हणाले की, “तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करण्यास सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मी त्यानंतर जेवेन.” त्यानंतर संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून घोकमपट्टी करून घेतली. संतोष बांगर चिमुकल्यांना हा अजब सल्ला देत असताना शाळेतील कर्मचारी, शिक्षिका आणि बांगर यांचे कार्यकर्ते हसत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles