Monday, May 20, 2024

नगर जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, 3 जण ठार…

नगर: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या भीषण अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे अपघातातील मृतांची नावे आहेत. स्विफ्ट डिझायर कार क्र, एमएच २१ बीएफ ९२४८ कार मध्ये ५ जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर ५०४ जवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त कंटेनर ट्रेलर क्रमांक एमएच ४६ एएफ ९८३३ ला पाठीमागून जोराची धडक दिली. यामधे स्विफ्ट कारमध्ये असलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles