जर तुमचे शिक्षण आठवी पास असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. गोवा होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्श ऑर्गनायझेनशनने होमगार्डच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून आहे. होमगार्ड भरतीमध्ये १४३ जागांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आठवी पास असणे गरजेचे आहे. या भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयासाठी सूट देण्याची तरतूद केली आहे.
याआधी होमगार्ड असलेल्या उमेदवार या भरतीसाठी पात्र नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची शारिरीक टेस्टदेखील घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची किमान ५.५ इंच असावी तर महिला उमेदवारांची उंची किमीन ४.११ इंच असावी. याशिवाय शारिरिक टेस्टमध्ये उमेदवारांची शर्यत घेण्यात येणार आहे. यासाठी पुरुष- १ किलोमीटर (५ मिनिटे) तर महिला- ८८ मीटर (५ मिनिटे ३० सेकंद) अशी पीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, तोंडी परीक्षा आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर केली जाणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.
HOME GUARD BHARTI
Comments are closed.