Hrithik Roshan..
अभिनेता हृतिक रोशनची आजी पद्मरानी ओमप्रकाश यांचं गुरुवारी मुंबईत निधन झालं. पद्मरानी या दिवंगत चित्रपट दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांच्या पत्नी आणि हृतिकची आई पिंक रोशन यांच्या आई होत्या. त्या 91 वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. पद्मरानी या गेल्या काही वर्षांपासून हृतिकची आई पिंकी रोशन यांच्यासोबत राहत होत्या. पिंकी रोशन यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला. ‘बाबांना भेटण्यासाठी माझी आई पद्मरानी ओमप्रकाश आम्हाला सोडून गेली. तिच्या आत्म्याला शांती लाभो’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली.