एक बॉटल, दोन ग्लास… अभिनेत्री हृता दुगुळे चा भन्नाट उखाणा..व्हिडिओ

0
916

झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर अलिकडेच अभिनेत्री हृता दुगुळेने तिच्या सासूबाई मुग्धा शाह यांच्यासह हजेरी लावली होती. यावेळी तिने या मंचावर मंगळागौर खेळतानाच नवऱ्यासाठी भन्नाट उखाणा घेतला.
हृता दुर्गुळेचा हा व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये काही बायका हृता दुर्गुळेला मंगळागौर खेळल्यानंतर उखाणा घेण्याचा आग्रह करतात. सुरुवातीला ती नकार देते पण नंतर तिच्या उखाण्यावर कोणीही हसणार नाही या अटीवर उखाणा घ्यायला तयार होते. या व्हिडीओमध्ये हृता उखाणा घेताना म्हणतेय, “एक बॉटल, दोन ग्लास… प्रतीक माझा फर्स्टक्लास…”