रेखा आणि अक्षय, अशी या जोडप्यातील व्यक्तींची नावे आहेत. जेवणासाठी काय बनवायचं, असे रेखा तिच्या नवऱ्याला म्हणजे अक्षयला विचारते. त्यावर अक्षय ‘काहीही बनवं’ असे उत्तर देतो. सारखे सारखे हेच उत्तर ऐकून रेखाला एक मजेशीर कल्पना सुचते. ती तवा गॅसवर ठेवते आणि ‘काहीही’ अक्षर लिहिण्यासाठी बेसनच्या पिठाचा उपयोग करते. तव्यावर ‘कुछ भी’ असे हिंदी भाषेत एक एक अक्षर लिहिते. नंतर ताटामध्ये प्रत्येक अक्षर ओळीत लावून बाजूला टोमॅटो सॉसने सजावट करते आणि नवऱ्याला जाऊन देते. नवरा ‘काहीही’ बनवायला सांगतो म्हणून ती ‘कुछ भी’ हा शब्द तव्यावर तयार करून, नवऱ्याला जेवण म्हणून खायला देते. आई स्वयंपाक करायला घेताना मुलांना किंवा बाबांना विचारते, आज जेवणात काय बनवू? त्यावर प्रत्येक जण ‘काहीही बनव’ असे हमखास उत्तर देतो. तर यावर उपाय म्हणून या जोडप्याने मजेशीर व्हिडीओ बनवला आहे.






