Saturday, January 13, 2024

नगरमध्ये बंद खोलीत पतीला दुसर्‍या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडले, पुढे घडलं भलतंच!

अहमदनगर - बंद खोलीत पतीला दुसर्‍या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडल्याने रागातून पतीने इतरांच्या मदतीने पत्नीला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीवर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये फिर्यादीच्या पतीसह त्याच्यासोबत पकडलेली महिला व तिच्या नातेवाईकांचा समावेश आहे. फिर्यादी या त्यांच्या पती व तीन मुलांसह नगर शहरातील उपनगरात राहतात. त्यांनी सोमवारी (दि.८) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या पतीला दुसर्‍या एका महिलेसोबत बंद खोलीमध्ये नको त्या अवस्थेत पकडले. त्याचा राग मनात धरून त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना बोलून घेतले. नातेवाईकही घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादीला लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी केली.

तसेच पतीने देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी झालेल्या फिर्यादीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles