जामखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका वीज पडून चार जनावरे मृत्यूमुखी
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. आज सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या अवकाळी व विजेच्या कडकडाटास पाऊस सुरू झाला यात वीज पडून
तालुक्यात दोन गायी एक बैल एक वासरू मृत्यूमुखी पडले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार गणेश माळी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी साकत येथे पांडुरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्यू झाला होता आज झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कुसडगाव येथील बिभीषण रामचंद्र भोरे यांची गाय, जवळके येथील अंकुश वाळुंजकर यांची गाय, दादासाहेब हाडोळे यांचा बैल तर भुतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहे.
दोन गायी, एक बैल व एक वासरू सह फळपीकांचेही काही भागात नुकसान झाले आहे. वीजेच्या कडकडाटामुळे जामखेड शहरातील लाईटही पाच ते सहा तासांपासून बंद होती.
तहसीलदार गणेश माळी यांनी नुकसानग्रस्त पिकांचे शेतकऱ्यांचे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.