Monday, May 20, 2024

धूम स्टाईलने मंगळसूत्र चोरणाऱ्या इराणी टोळीतील दोन आरोपींना अटक

अहमदनगर – पंचवटी हॉटेल येथे पायी चालत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडणाऱ्या श्रीरामपूर येथील इराणी टोळीतील दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध तोफखाना पोलीस घेत आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेला सोन्याचा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. या प्रकरणात सुनिता हरिदास बांगर यांनी फिर्याद दिली होती.तोफखाना पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी ह्या पायी चालत जात असताना एका मोटार सायकलवर तीन अनोळखी इसमने फिर्यादीचे जवळ येवुन मोटार सायकलवर मध्ये बसलेला इसमा ने फिर्यादीचे गळयातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून तोडले. त्यावेळी फिर्यादीने गळयाला गंठनला हात लावला असता त्यातील काही भाग फिर्यादीचे हातात राहीला व किमतीचा भाग बळजबरीने तोडुन तिनही इसम त्यांच्याकडील मोटार सायकलवर भरधाव वेगात निघून गेले होते.या घटनेनंतर फिर्यादी सुनिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्याकडे दिला होता . सोळंके हे तपास करत असताना हा गुन्हा सादक शामल खान, (वय 30), रियाज फैयाज इराणी (वय 42) आणि शाहरुक इसुस शेख (फरार) यांनी केल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी पोलीस,उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे,पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप बडे,पोलीस नाईक दिपक जाधव ,पोलीस नाईक शैलेश गोमसाळे ,पोलीस सतीश त्रिभुवन यांच्या पथकाने सादक शामल खान आणि रियाज फैयाज इराणी या आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles