जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे १३ कि. मी. चे काम पंधरा महिन्यांत २५% काम, अर्धवट कामामुळे नागरीक त्रस्त, धुळीमुळे आजारी रूग्ण वाढले, खा. विखेचा ड्रीम प्रोजेक्ट
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
जामखेड (नासीर पठाण)- जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे तेरा कि. मी. चे काम सुरू होऊन सव्वा वर्ष होऊन गेले पण २५ टक्के काम झाले नाही. संथगतीने चालु असलेल्या कामामुळे नागरीक हैराण झाले आहे. ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे कधी काम चालू होते व बंद पडते हे समजत नाही. यामुळे जामखेड शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी रस्त्याच्या भुमिपुजन प्रसंगी हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले होते. या रस्त्यासाठी त्यांनी अधिकारी, ठेकेदार व नागरीकांच्या बैठक घेऊन सुचना केल्या. या सुचनेला, ठेकेदार, अधिकारी व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवला. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे रस्ताच नको म्हणण्याची वेळ जामखेडकरावर आली आहे.
जामखेड शहरातून जामखेड – सौताडा महामार्ग एनएच ५४८ डी चौपदरीकरणाचे १३ कि. मी. चे काम पुणे येथील ठेकेदार कंपनीने ५० कोटी रक्कम कमीने घेतले. यासाठी दोन उपठेकेदाराने काम अर्धवट सोडून पळून गेले. या तेरा कि. मी. रस्त्यात पक्का मुरूम टाकण्याऐवजी रस्त्यातील उकरलेली माती टाकून बुजून टाकून लेवल केली आहे. शहरातील चालू कामाची त्रेधातिरपीट झाली आहे.
कुठे अर्धवट नाली व कुठे रस्ता खोदून मध्येच सोडून पुढे खोदून ठेवले जात आहे. मागचे पुर्ण न करता अर्धवट सोडून पुढचे खोदलेल्या कामावर पंधरा पंधरा दिवस काम होत नाही अशा पद्धतीने अत्यंत मंद गतीने काम चालू असल्याने नागरिकांना, वाहनांना फार त्रासदायक ठरत आहे .वाहतुकीचा खोळंबा झाला आहे .रूग्णवाहिकेला सूध्दा मोठ्या कष्टाने रस्ता काढावा लागत आहे. पायी चालणारे माणसं जीव मुठीत धरून चालत आहेत. वहातूक सुरळीत करण्यास वहातूक पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागते.
बीड रोडवरून कोठारी पेट्रोल पंपापर्यत जाण्या येण्यासाठी कोणत्याही वाहनांना आर्धा तास लागत आहे .त्याचत धूळीघे लोट उठत आहेत. ती धूळ दाबण्यासाठी ठेकेदाराकडुन रस्त्यावर पाणी टाकण्याचा तकलादू प्रयत्न चालू आहे. त्या पाण्याने चिखल होऊन रस्त्यावर मातीचे टेकडे झाल्याने अनेकांना मणक्याचा त्रास तर धुळीमुळे घसा बसला आहे. निसरड्या रस्त्यामुळे अनेक ठिकाणी मोटारसायकल घसरून पडत आहेत. अनेकांना दवाखान्यात जावे लागत आहे .हा सगळा प्रकार नेतेमंडळी व आधिकारी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. दरम्यान प्रा मधुकर राळेभात यांनी कामाचा दर्जा सूधारण्यासाठी व शहरातील कामाचा वेग वाढण्यासाठी उपोषण केले होते. तेव्हा कामात सुधारणा वेग देण्याचे आश्वासन व त्याची वेळ डिसेंबरमध्येच संपली.
सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाचे, सामाजिक कार्यकर्ते कोणालाच रस्त्याच्या कामामुळे होणारा त्रास जाणवत नाही. नेमके हे लोक गप्प आहेत? यांना गप्प केले आहे का? हेच जनतेला समजेना. खा. सूजय विखे यांनी सदर कामाबाबत आढावा बैठक घेऊन मुख्य शहरातील काम वेगात व दर्जेदार करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र ते आदेश बैठकीपूरतेच मर्यादीत राहिले. खासदार विखे येणार म्हटले की ठेकेदाराची व अधिकाऱ्यांची यंत्रणा टाईट.
दोन्ही बाजूच्या गटाराच्या पलीकडील रस्त्यावर असलेले साडेतीन मिटर अंतर सोडून अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात मुख्याधिकारी यांनी केवळ नोटिसा दिल्या फक्त टपरीधारक काढले पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण कधी काढणार याबाबत मुख्याधिकारी अजय साळवे सांगू शकत नाही. अंतर कमी झाले का ? याबाबत वेगवेगळ्या अफवा आहेत.
संदीप गायकवाड – नागरीक
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने धुळीचा व मणक्याचा त्रासाचे रूग्ण वाढले आहे. रस्त्यावर दर्जा खालावलेला आहे. अधिकारी नगरवरून कधीतरी येतात. ठेकेदार कंपनीचा कोणीही जवाबदार माणुस नाही. कामगार सांगितले तेवढेच काम करतात. जामखेड मूख्य शहर कोठारी पेट्रोल पंप ते शासकीय दूध डेअरी बीड रोड पर्यंत जाण्यासाठी एक तास लागतो. वाहतूक कोंडी नित्यनेमाने होत आहे. अत्यंत धीम्या गतीने काम चालू आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ठेकेदाराने लवकरात लवकर काम पुर्ण करावे.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड
Home नगर जिल्हा जामखेडमध्ये खासदार विखेंच्या ड्रीम प्रोजेक्टची धूळधाण…राष्ट्रीय महामार्गाचे दीड वर्षात २५ टक्केच काम