Monday, April 22, 2024

आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे नाहीत…

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, शिंदे गटावर नाराज असलेल्या हेमंत गोडसेंसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दरवाजे उघडे आहेत का? यावर खासदार संजय राऊत म्हणाले, खासदार गोडसे हे सध्या शिंदे गटात असले तरी आम्ही त्यांना निवडून आणलं होतं. परंतु, आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे नाहीत. तुम्ही आमचा दरवाजा ठोठावलात, अंगणात बसलात, छाती बडवली तरीदेखील गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर मला वाटतं की, आमच्या निष्ठावंतांचा अपमान होईल. अनेक निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि स्वाभिमानी शिवसैनिक मिळून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आहोत. गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर या सर्व निष्ठावंतांचा अपमान होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles