Monday, May 20, 2024

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्‍ता 9 वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

jawahar navoday vidyalay
नगर :- जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे शैक्षणिक सत्र 2022-23 साठी इयत्ता 9 वी मध्ये रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा दि. 9 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षार्थीची बैठक व्यवस्था पुढील परीक्षा केंद्रावर करण्यात आलेली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्‍वर, ता. पारनेर येथे 240 परीक्षार्थींसाठी परीक्षेचे रोल नं. 217648 ते 217887, श्री. ढोकेश्‍वर विद्यालय, टाकळी ढोकेश्‍वर, ता. पारनेर येथे 240 परीक्षार्थींसाठी परीक्षेचे रोल नं. 217888 ते 218127 आणि मातोश्री सेकंडरी स्‍कूल कर्जूले हर्या, टाकळी ढोकेश्‍वर, ता. पारनेर येथे 166 परीक्षार्थींसाठी रोल नं. 218128 ते 218293 अशी एकूण 646 परीक्षार्थींची बैठक व्‍यवस्था करण्‍यात आली आहे.

ही प्रवेश परीक्षा लेखी स्वरुपाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षा प्रवेश www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरुन डाउनलोड करावेत. प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी युजरनेम मध्ये रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड मध्ये आठ आकडी जन्म तारीख टाकावी व प्रवेश पत्राच्या दोन प्रती प्रिंट करुन घ्याव्यात प्रवेश पत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्र निर्धारित वेळेवर प्रवेश पत्रासहित उपस्थित राहावे प्रवेश पत्रावर दिलेल्या सर्व सूचना कोव्हीड 19 मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्‍वरचे प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles