उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी (२६ नोव्हेंबर) जुन्नरमध्ये सभा पार पडली. यावेळी अजित पवार म्हणाले, “शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपाबरोबर सत्तेत बसलेलं का चालत नाही?” अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं सरकार आता जातंय हे समजलं होतं त्याचवेळी पक्षातील सगळ्यांनी ठरवलं होतं की, आपण आता भाजपाबरोबर सरकारमध्ये जायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील झालेलं चालतं, मग महायुतीत भाजपाबरोबर गेलं तर का चालत नाही? राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. परंतु, वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तो बरोबर आणि आम्ही घेतला तर तो चूक… असं कसं चालेल?