राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 दशकं आणि 4 टर्म आमदार राहिलेले आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार आणि अजित पवार आले होते. वल्लभशेठ बेनके यांचा अंत्यविधी त्यांच्या जन्मगावी हिवरे बुद्रुकमध्ये झाला.
बेनके यांच्या अंत्यदर्शनासाठी अजित पवार आणि शरद पवार आले होते. या कार्यक्रमाला दोन्ही नेते बाजू बाजूलाच बसले होते, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांसोबत गेलेले आमदार दिलीप वळसे पाटील हेदेखील वल्लभशेठ बेनके यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते.






