Kaali..काली चित्रपटाचे पोस्टर वादग्रस्त..महंत, साधूंनी दिला निर्मातीला इशारा

0
507

Kaali…काली चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या महंतांनी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांना धमकी दिली आहे. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटलं की, चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या उद्धटपणाला क्षमा करता येणार नाही. महंत राजू दास म्हणाले की, हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर कोणीही सांभाळू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू. त्यांनी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही नेमकी इच्छा काय आहे? की तुमचंही शीर धडापासून वेगळं व्हावं? दिग्दर्शिका, कवयित्री आणि अभिनेत्री लीना मणिमेकलाई यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरमधअये देवी कालीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढत असताना दिसतेय. अभिनेत्रीच्या एका हातात LGBTQ चा ध्वज आहे. या पोस्टवरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.