उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली डॉ.श्रीकांत शिंदेंची उमेदवारी

0
34

महायुतीमधील बहुप्रतीक्षित कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली.

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील, भाजपचा पाठिंबा असेल, मोठ्या मतांनी निवडून आणू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. श्रीकांत शिंदे यांनी आधीच प्रचाराचा नारळ फोडला होता.