‘चंद्रमुखी २’ चा ट्रेलर प्रदर्शित… कंगणा रणौतच्या लूकची चर्चा…

0
33

कंगना रणौत ‘चंद्रमुखी २’ मुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकनंतर आता ‘चंद्रमुखी २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. चंद्रमुखी २’ मधील तिचा फर्स्ट लूक ५ ऑगस्टलाच प्रदर्शित झाला होता. कंगनाचा चंद्रमुखी लूक लोकांना खूप आवडला. ‘चंद्रमुखी २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कंगना या चित्रपटात तिच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा काहीतरी वेगळ्या अवतारात आणि लूकमध्ये दिसत आहे.