विठ्ठल विठ्ठल… प्रसिद्ध मराठी अभिनेत्री करतेय वारकरींची सेवा… व्हायरल व्हिडिओला नेटकरींची दाद

0
690

राज्यात दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी वारीमुळे सगळे भक्तीमय होऊन तल्लीन झालेले पहायला मिळत आहे. या वारीमध्ये सगळ्याच क्षेत्रातील लोक सहभागी होत असून उत्साह मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकजण वारीमध्ये सगळ्यांची मदत करताना दिसत आहेत. तर अनेकजण वारीमध्ये सेवा करताना पहायला मिळतायेत. अशातच मराठी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीदेखील वारीला गेली असून ती भक्तीभावानं वारीला आल्यांची सेवा करताना दिसत आहे.