19 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर होते. लालबागच्या राजाचं हे रूप पाहून भाविकांमध्ये उत्साह संचारला. लालबागच्या राजाचं हे पहिलं रूप अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवलं. तर काहींना हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही.