आपल्या भावाला ओवाळणाऱ्या चिमुकल्या पोरीच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत आहे. तर, ओवाळणीवेळी मुलीची आई भाऊबीजेचं लोकप्रिय मराठी गीत… ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया… म्हणत असल्याचंही दिसून येतं. त्याचवेळी, वेड्या बहिणीची वेडी माया… हे शब्द ऐकताच हाती ओवाळणीचं ताट घेतलेली चिमुकली रागावून तिच्या आईकडे पाहते आणि म्हणते… मला तू वेडी बोलतेयस… त्यावेळी एकच हशा पिकतो. चिमुकल्या मुलीचे हावभाव आणि प्रश्न विचारतानाची नजर पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांना हसू आवरणार नाही.
— mahanagar news (@mahanagarnews) October 27, 2022






