अनेक वर्षांपूर्वी टीम इंडियाचा फलंदाज अजय जडेजा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित दोघांची जोडी जमू शकली नाही. दोघांनी एकत्र येणं हे नियतीला मान्य नव्हतं. तेव्हा माधुरी आघाडीची अभिनेत्री होती. माधुरीने आपल्या अभिनयाने आणि डान्सने तिच्या चाहत्यांना वेड लावलं होतं. मात्र हीच माधुरी टीम इंडियाचा कॅप्टन अजय जडेजाच्या प्रेमात वेडी झाली होती. माधुरी अजयच्या प्रेमात वाटेल ते करायला तयार होती. मात्र कधी परिस्थीमुळे तर कधी कुटुंबाच्या विरोधामुळे अजय आणि माधुरी एक होऊ शकले नाहीत.
अजय जडेजा आणि माधुरी दीक्षीत या दोघांची पहिली भेट ही एका जाहीरातीच्या शूटिंगदरम्यान झाली. इथून दोघांमध्ये जवळीक वाढली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळलं नाही.