Maha minister 11 lakh paithani
आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेल्या महामिनिस्टर पर्वाचं नाव असून, दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत झी मराठी चॅनेलवरून हा कार्यक्रम प्रसारित होतो. या पर्वात विजेत्या महिलेला तब्बल 11 लाख रुपयांची पैठणी मिळणार आहे.आता या 11 लाखांच्या पैठणीमागचा सामाजिक दृष्टिकोन जाहीर करण्यात आला आहे.
ही 11 लाखांची पैठणी दिव्यांग कलाकारांनी तयार केली आहे. 11 लाखांची पैठणी येवल्यातच तयार झाली आहे; मात्र ती तयार केली आहे बोलता आणि ऐकता न येणाऱ्या कलाकारांनी. या पैठणीला अस्सल सोन्याची जर असेल आणि खऱ्या हिऱ्यांनीही ती चमचमत असेल; मात्र दिव्यांग कलाकारांच्या कौशल्यामुळे या पैठणीचं तेज आणखी वाढलं आहे. या उपक्रमाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम चॅनेलवरून नुकताच शेअर करण्यात आला आहे.
11 लाखांच्या पैठणीबद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी येवल्यात गेल्यानंतर जे काही दिसलं, ते बांदेकर यांनी या निवेदनातून सांगितलं आहे. चित्र रेखाटण्यापासून बारीक विणकामापर्यंतचा पैठणीच्या निर्मितीचा सारा प्रवास या व्हिडिओत दिसत आहे.
ALSO READ
Bollywood news…‘त्या’ जाहिरातीवरुन Akshay Kumar चा माफीनामा…






