Monday, May 20, 2024

मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही; महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवाराचं मोठ वक्तव्य

मुंबई : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही. काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार-खासदार होणार असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी केलंय. महादेव जानकरंना महायुतीकडून परभणीतून उमेदवारी देण्यात आलीय, अशात त्यांनी असे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. ते एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, परभणीतून आपणच निवडून येईल. मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून ७० टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही जानकरांनी व्यक्त केलाय. जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे महादेव जानकरांची लढत संजय जाधव यांच्याशी आहे.

बारामती शहराने २०१४ साली मला जरा अजून प्रेम मिळालं असतं तर मी पवारांना हरवलं असतं. मागीलवेळी तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहचलं नव्हतं, वेळही मिळाला नव्हता. मला अनेकजण म्हणत होते की, कमळ चिन्हावर लढा. पण मी ठरवलंय, आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढायचं नाही. मी पक्ष काढलाय माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे. मी युती कुणाशीही करेन असं जानकर म्हणालेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles