भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक महत्त्वाचा प्रस्ताव दिल्याचं वृत्त आहे. नड्डा यांनी शिंदेंशी यांच्याशी तासभर चर्चा केली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप हे चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे होते. ज्या मतदारसंघांमध्ये संभ्रम असेल तिथे महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील, असा प्रस्ताव नड्डांनी शिंदेंना दिला आहे. यामुळे उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढेल आणि महायुती अधिक जागा जिंकू शकेल, असं नड्डांकडून शिंदेंना सांगण्यात आलं आहे. शिंदेंनी नड्डा यांच्या प्रस्तावावर अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रस्तावावर येत्या काही दिवसांत आणखी चर्चा होऊ शकते. ईटीव्ही भारतनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
शिवसेनेत फूट पाडली, पक्ष, चिन्ह मिळवलं आणि निवडणुकीत उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढवले, असा संदेश मतदारांमध्ये गेल्यास तो शिंदेंना महागात पडेल. तर दुसरीकडे भाजपला यामुळे फायदा होईल.






