छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवार स्पष्टच बोलले… म्हणाले…

0
35

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर नाव न घेता मोठं भाष्य केलं. “काही मान्यवरांना आपण थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला”, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.

“मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी आपण काही नावं मंत्रिपदासाठी दिली. तेव्हा त्यामध्ये काही मान्यवरांना आपण थोडसं थांबायला सांगितलं. मात्र, त्यानंतर काहींनी रोष व्यक्त केला. आता वास्तविक काही नवीन लोकांनाही मंत्रिमंडळात संधी द्यावी लागते. तसेच कधी-कधी आपण जुन्या नेत्यांना या ठिकाणी संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल? याबाबतही विचार केलेला आहे. ज्यांना वाटतं की योग्य मानसन्मान दिला गेला पाहिजे. तो मानसन्मान देण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही”, असं अजित पवारांनी कोणाचंही नाव न घेता म्हटलं. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख हा छगन भुजबळ यांच्याकडे होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.