उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार प्रा राम शिंदे यांनी पुण्यातील नामचिन गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याची भेट घेतल्याचे फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. घायवळ बंधू हे मुळचे कर्जत-जामखेडमधील असल्याने ही भेट रोहित पवार यांनाच पाडण्यासाठी असल्याची चर्चा राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या भेटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दोघांच्याही भेटीचे फोटो शेअर करत लवांडे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामचीन गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ सोबत आज कसली मीटिंग केली असेल? कोणत्या सामाजिक विकासाची चर्चा झाली असेल? तसेच कर्जत जामखेड चे माजी आमदार राम शिंदे यांचेशी सुध्दा बैठक झाली ती कोणत्या सामाजिक विषयावर असेल? सेटिंग? असे सवाल त्यांनी या भेटीवर उपस्थित केले आहेत.