मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य, सरकारमधील बड्या मंत्र्यांची माहिती

0
16

मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे. आता ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, असंही केसरकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमका काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलनाविषयी आपली भूमिका जाहीर करणार आहे.