मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मानसी ही सोशल मीडियावर जास्त सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका रील व्हिडीओमुळे मानसी नाईक ट्रोल झाली आहे.
आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच मानसीने ‘भागे रे मन’ या गाण्यावर एक रील व्हिडीओ केला आहे.या व्हिडीओत मानसी ही निळ्या रंगाची साडी परिधान करुन पळताना दिसत आहे. “कुछ तो चाहत रही होंगी, इस बारिश की बूंदो की, वर्ना कौन गिरता है जमीन पर,आसमान तक पहुंचने के बाद”, असे कॅप्शन मानसीने या व्हिडीओला दिले आहे.