गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर ‘बहरला हा मधुमास’ हे एकच गाणं कानावर पडत आहे. या गाण्याची अनेक कलाकारांना, इन्स्टाग्राम रिल स्टार्सला तसेच सर्वसामान्यांना भूरळ पडली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. नुकतंच या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भाचीने डान्स केला आहे. तिने याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
प्राजक्ता माळी ही सोशल मिडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात प्राजक्ता माळीची भाची याज्ञसेनी नाचताना दिसत आहे. यावेळी तिच्यासमोर मोबाईलवर ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं लागलेलं दिसत आहे