प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत,आयुष्यात कितीही घरं झाली, तरी माझं आवडतं ठिकाण…

0
36

सध्या प्राजक्ताही करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानंतर तिने कर्जतमधील तिच्या नव्या फार्महाऊसची झलकही दाखवली होती. आता तिने तिच्या आवडत्या ठिकाणाबद्दलचा खुलासा केला आहे.

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हींगचा आश्रम पाहायला मिळत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.