झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम ‘परी’ अर्थातच मायरा वैकुळ हिनं कमी कालावधीत प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे परी सतत चर्चेत असते. तिच्या फोटो, व्हिडीओ आणि आगामी एपिसोडविषयी चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच छोट्या परीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आगामी एपिसोडची एक झलक पहायला मिळत आहे.
श्रावण महिना सुरु झाला असून सगळीकडे मंगळागौरीचा खेळ सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेकजण हा सण अगदी धुमधडाक्यात साजरा करतात. मराठी मालिकांमध्येही या सणाचं खूप महत्त्व दाखवलं जातं. अनेक निरनिराळे खेळ यानिमित्तानं घेतले जातात. अशातच चिमुकल्या परीचा मंगळागौर खेळतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील परीचा लुक आणि क्युट डान्स चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडतोय.






