Monday, May 20, 2024

एस.टी. कर्मचाऱ्यांचे शरद पवार यांच्या निवासस्थानी चुकीचे वर्तन…आ.निलेश लंके यांनी केला निषेध

नगर: एस टी कर्मचाऱ्यांनी आज संताप व्यक्त करण्यासाठी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी धडक देत अक्षरशः धुडगूस घातला. या घटनेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे की,
निषेधच..

महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपली संपूर्ण हयात कष्टकरी, शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांसाठी खर्ची केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्य सरकारने त्यांच्या बाबत कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र उगाचच कोणाच्या तरी सांगावा आणि भडकावण्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी जनसामान्यांचे नेतृत्व असणाऱ्या पवार साहेबांच्या सिल्वर ओक समोर चुकीच्या पद्धतीने वर्तन केले आहे. ही बाब खरोखर निंदनीय आहे. एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की कोणाच्या तरी सांगण्यावरून असे प्रकार करू नयेत. शरदचंद्रजी पवार साहेब हे जनसामान्यांचे नेते आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली आहे. याचा कृपया विसर पडून देऊ नये.

-निलेश लंके
आमदार पारनेर- नगर

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles