Monday, May 20, 2024

शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल…. राजेंद्र फाळके यांनी केला तीव्र निषेध

नगर: एस टी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला बोल करीत राज्यात खळबळ उडवून दिली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. राजेंद्र फाळके यांनी म्हटले आहे की,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवास्थानावर झालेल्या भ्याड हल्लाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. या मध्ये सहभागी असणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles