अशा जिल्ह्यात बदली करू की बायकोचा फोनही लागणार नाही, आ.नितेश राणेंचा पोलिस अधिकाऱ्यांना जाहीर सभेत दम…

0
39

लव्ह जिहादवर भाषण करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंनी थेट पोलिसांनाच धमकी दिली. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असं ते म्हणाले. सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं.

आमदार नितेश राणे यांनी सांगलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम भरला. सरकार हिंदूचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायको फोनपण लागणार नाही अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना दम दिला. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो.