मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

0
32

दुष्काळ तसेच पाणीटंचाईचा झळा सहन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा लवकरच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण, वेळेआधीच मान्सूनचे केरळात आगमन होणार आहे. केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि खरीप हंगामातील पेरणीही वेळेत होऊ शकते.

आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या १० दिवसांत तो केरळमध्ये येऊ शकतो. ३१ मेपर्यंत मान्सून संपूर्ण केरळला व्यापण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४ दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होईल.

यंदा मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. मागील ५ वर्षांची आकडेवारी बघितली तर, २०१९ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. २०२० मध्ये १ जूनला मान्सून केरळात आा. २०२१ मध्ये ३ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले. २०२२ – २९ मे, २०२३ – ८ जून आणि २०२४ मध्ये ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे.