नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा खा.डॉ.सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विखेंची उमेदवारी जाहीर होताच विखे समर्थकांनी जल्लोष केला आहे. सोशल मिडियावर विखे समर्थकांनी प्रचार कॅम्पेनही सुरु केले आहे. सोशल मिडियावर समर्थक पोस्ट टाकत असून क्यो पडे हो चक्कर में कोई नही है टक्कर में असा मजकूर लिहून विखे समर्थकांनी विरोधकांना डिवचले आहे. भाजप 400 पार तर विखे पाटील 4 लाख पार असा मजकूरही पहायला मिळत आहे. सुजयपर्व टॅगलाईन देत समर्थक आता थेट निकालानंतरचा जल्लोष करायचा असेही म्हणत आहेत.






