Monday, May 6, 2024

मोठा गौप्यस्फोट….एकनाथ शिंदे यांचे कॅशचे गोडावून सापडलं होतं, नंतर ते उद्धव ठाकरेंकडे येऊन रडले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं असा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे. भाजपासह चला किंवा तुम्हाला आतमधे टाकू असं त्यांना सांगण्यात आलं होतं असंही आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंना ऑफर दिली गेली होती कॅश की जेल? त्यांचं कॅशचं गोडाऊन प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडलं. त्यांना सांगण्यात आलं येताय बरोबर की आत टाकायचं? मग एकनाथ शिंदे त्यांची दाढी खाजवत रडायला लागले. एकनाथ शिंदे २० मे २०२२ ला वर्षा बंगल्यावर आले होते. उद्धव ठाकरेंना त्यांनी रडत सांगितलं, मला धमकावलं जातं आहे. जेलमध्ये जाण्याचं हे वय नाही मी काय करु साहेब? तुम्ही काहीतरी करा, भाजपासह चला. हे आम्हाला आतमधे टाकतील असं रडगाणं झालं होतं.” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles