विद्यमान खासदारांनी निवडून आल्यानंतर पाच वर्षे जनतेला वाऱ्यावर सोडले…. निलेश लंके यांची टीका…

0

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बेलवंडी, श्रीगोंदा येथे भव्य प्रचारसभा संपन्न झाली. या सभेस जमलेला प्रचंड जनसमुदाय हा अहमदनगर दक्षिण तथा अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या परिवर्तनाची, आपल्या समृध्द लोकशाहीची साक्ष देणारा होता. आपण सर्वांनी एकच कुटुंबाला जवळपास ५०-५५ वर्षे सत्ता दिली. मात्र सत्ता म्हणजे आपल्या कुटुंबाचं भलं करण्याची योजना आहे असे धोरण त्यांनी राबवले.

आपला देश कृषीप्रधान असताना आपल्या देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात असं असतानाही आपल्या भागाच्या खासदारांनी एकदाही संसदेत शेतकऱ्यांची बाजू मांडली नाही ही शरमेची बाब आहे. याउलट कांदा निर्यातबंदी झालेली नसतानाही मतदारसंघात येऊन शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप त्यांनी केलं. आपल्या जिल्ह्यात बेरोजगारीचे उच्चांक गाठला आहे. शेतकरी महागाईने त्रस्त आहे, त्याच्या शेतमालाला भाव नाही म्हणून उध्वस्त झाला आहे.

लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत किमान एकदा येऊन आपल्या समस्या जाणून घ्याव्यात अशी जनतेची अपेक्षा असते, आपल्या खासदारांनी मात्र निवडून गेल्यानंतर ५ वर्षे जनतेला वाऱ्यावर सोडलं.
हे चित्र आपल्याला बदलायचं आहे, आपल्याला संविधानाचं, लोकशाहीचं रक्षण करायचं आहे. प्रत्येक संकटात मायबाप जनतेला साथ देणारा,३६५ दिवस २४ तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सेवेसाठी कटिबध्द असणार आहे. हा बदल घडवण्याची ताकद जनतेच्या हातात आहे, जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याने आता परिवर्तन अटळ आहे हा विश्वास यावेळी निलेश लंके यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी घनश्याम अण्णा शेलार, राहुलदादा जगताप, बाबासाहेब भोस यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here