आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचा जवळचा सहकारी सुरज चव्हाण याला ईडीने अटक केली आहे. मुंबई महापालिका ११३ कोटींच्या खिचडी कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने सुरज चव्हाणला अटक केली आहे. याआधीही या घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण याची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
सुरज चव्हाण याच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरज चव्हाण यांच्या अटकेचं मी स्वागत करतो, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.