Monday, May 20, 2024

शहराचा पाणी पुरवठा 8 दिवसांत सुरळीत करा अन्‍यथा कारवाई

शहराचा पाणी पुरवठा 8 दिवसांत सुरळीत करा अन्‍यथा कारवाई करणार –
मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर महानगरपालिका शहर व उपनगरात तसेच कल्‍याण रोड परिसरातील होणारा
पाणी पुरवठा विस्‍कळीत झाला होता त्‍या अनुशंगाने मा.महापौर सौ.रोहिणीताई
संजय शेंडगे यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी
मा.उपमहापौर श्री. गणेश भोसले, महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती
सौ.पुष्‍पाताई अनिल बोरुडे, माजी विरोधी पक्ष नेते श्री.संजय शेंडगे,
शिवसेना शहर प्रमुख श्री.संभाजी कदम, नगरसेवक श्री. गणेश कवडे, श्री.सचिन
शिंदे, श्री.श्‍याम नळकांडे, श्री. प्रकाश भागानगरे, श्री.प्रशांत
गायकवाड, उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता
श्री. सातपुते, श्री.गाडळकर,श्री.रोहोकले, श्री.गिते, माजी प्राचार्य
श्री.खासेराव शितोळे, श्री.काटे सर, श्री. पारुनाथ ढोकळे आदि उपस्थित
होते.

यावेळी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे म्‍हणाल्‍या की, गेल्‍या अनेक
महिन्‍यापासून शहर व उपनगर व कल्‍याण रोड परिसर मध्‍ये पाणी पुरवठा
विस्‍कळीत झाला. मनपा अभियंता यांच्‍या कडून माहिती घेतली असता वसंत
टेकडी येथील नविन बांधलेल्‍या जलकुंभामध्‍ये पाण्‍याची पातळी कमी
प्रमाणात राहत असल्‍याने पाणी वितरण करताना अडचणी येतात. यावर उपाययोजना
म्‍हणून त्‍याटाकीला जास्‍त क्षमतेची पाण्‍याची मोटार वापरून पाणी टाकीत
टाकण्‍यात यावे अश्‍या सूचना केल्‍या. सध्‍या उन्‍हाळयाचे दिवस असून
नागरिकांना मोठया प्रमाणात पाणी वापरण्‍यासाठी लागत आहे. मनपा अभियंते व
फिटर यांनी वितरण व्‍यवस्‍थेवर लक्ष ठेवून सर्व भागाला पाणी शेवटच्‍या
घरापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्‍यावी. अमृत पाणी पुरवठा योजनेचे 3 ते 4
ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्‍याचे काम बाकी आहे ते जलद गतीने पूर्ण करावे.
यावेळी मा.उपमहापौर गणेश भोसले म्‍हणाले की, संपूर्ण शहरात पाणी पुरवठा
विस्‍कळीत झाला आहे पाणी पुरवठा विभाग एकत्रित बसून चर्चा करा
प्रत्‍येकाचे मत घ्‍या व पाणी पुरवठा सुरळीत होण्‍याच्‍या दृष्‍टीने
नियोजन करा. वसंत टेकडीच्‍या टाकीत पाण्‍याची पातळी वाढवून नागरिकांना
सुरळीत पाणी पुरवठा करा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्‍यास कारवाई करण्‍यांत
येईल. ‍

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles