अजित पवारांची गैरहजेरी, भुजबळांची नाराजी अशा चर्चा सुरु असताना पहाटेच्या सुमारास नाशिकच्या एमरॉल्ड पार्कमध्ये घडलेल्या घटनांनी अनेकजण बुचकळ्यात पडले. पहाटे साडे चारच्या सुमारास तटकरे हॉटेलवर पोहोचले. अर्ध्या तासानंतर ते इथून निघाले. विशेष म्हणजे शरद पवारांचा मुक्काम याच हॉटेलात होता. या दोन नेत्यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नाशिकच्या एमरॉल्ड हॉटेलमध्ये तटकरे येऊन गेल्याच्या वृत्ताला शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी दुजोरा दिला आहे. तटकरे साहेब येऊन गेल्याचं मला समजलं. त्यांची आणि माझी भेट झाली नाही. पण ते काही कार्यकर्त्यांना भेटले, अशी माहिती देशमुखांनी दिली. साथ सोडून गेलेल्यांना पु्न्हा सोबत घ्यायचं नाही, हे आमचं धोरण असल्याचं देशमुखांनी सांगितलं.
Home ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादीच्या दोन गटात चाललंय काय? नाशिकमधील हॉटेलात शरद पवार-सुनिल तटकरेंची भेट






