नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कारण महायुतीत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना समर्थन दिलं आहे.विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सध्या २१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अॅड. महेंद्र भावसार, भाजपचे विवेक कोल्हे यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.
Home ब्रेकिंग न्यूज नाशिक शिक्षक मतदारसंघ व्टिस्ट, अजितदादांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला खुला पाठिंबा