Home देश विदेश अजित पवारांना धक्का… ‘या’ लोकसभा मतदारसंघात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही…

अजित पवारांना धक्का… ‘या’ लोकसभा मतदारसंघात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही…

0

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह लक्षद्विपच्या निवडणुकीत वापरता येणार नाही. कारण अर्ज दाखल करायला उशीर झाला आणि दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवा, असा आदेश असा आदेश अजित पवार गट यांना देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून आता स्कूटर या चिन्हासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

एखाद्या प्रादेशिक पक्षाला देशभर एकच चिन्ह वापरायचे असेल तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत अर्ज दाखल करावा लागतो. परंतु असा अर्ज अजित पवार गटाकडून 24 मार्च रोजी दाखल केला गेला. मात्र, निवडणूक आयोगाचे नोटिफिकेशन जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेले होते.

यामुळे आता पहिल्या टप्प्याचे नोटिफिकेशन 20 मार्चला निघाले. त्यामुळे अर्ज दाखल करायला राष्ट्रवादीला उशीर झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह संपूर्ण देशभर वापरता येणार नाही.