Friday, May 10, 2024

अहमदनगर-दौंड रोडवर भीषण अपघातात एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

अहमदनगर- दौंड रोडवर हिवरे झरे (ता.नगर) शिवारात रस्त्यात उभ्या केलेल्या मालवाहू गाडीला मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. किरण मोहन कापसे (वय-४३,रा.गजानन वाडी, श्रीगोंदा रोड, काष्टी) असे मयताचे नाव आहे.

मयत कापसे हे बुधवारी (दि.२४) दुपारी १ च्या सुमारास दौंड रोडने नगरकडे येत असताना हिवरे झरे (काळेवाडी) शिवारात अशोक लेलंड कंपनीची मालवाहू गाडी चालकाने निष्काळजीपणे रस्त्यातच थांबवली. त्यामुळे कापसे यांच्या मोटारसायकलची मालवाहू गाडीला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत कापसे हे गंभीर जखमी होवून रस्त्यावर पडले. त्यांना नागरिकांनी रूग्णवाहिका बोलावून नगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ पाठविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबत मयत कापसे यांचा भाचा ऋषिकेश अशोक म्हस्के (वय-२६, रा. निंबळक, ता. नगर) यांनी गुरूवारी (दि.२५) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मालवाहू गाडी चालक हेमंत कैलाससिंह चौहान (रा. धरमपुरी, मध्यप्रदेश) याच्या विरूध्द भा.दं.वि. कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, २८३, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles