राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षण संबंधी अध्यादेशावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी तज्ञांची बैठक बोलावली आहे. याबाबतीत बोलताना राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल म्हणाले की छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेतच्या माध्यमातून मांडत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समता परिषदेचे काम करत आहेत. ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते. ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नाही, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर हात झटकले आहेत.