राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या आठ आमदारांना विधीमंडळानं नोटीस बजवली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. आता याबाबत आठ दिवसांत आपलं म्हणणं मांडण्याची विधीमंडळाच्या नोटीसीद्वारे या आठ आमदारांना मुदत देण्यात आली आहेत.
शरद पवार गटाकडून लवकरच यावर उत्तर दाखल करण्यात येणार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शरद पवार गटातील दहा आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
१) अनिल देशमुख, २) राजेश टोपे, ३) सुनिल भुसारा, ४) प्राजक्त तनपुरे, ५) रोहित पवार, ६) सुमन पाटील, ७) बालासाहेब पाटील, ८) संदीप क्षिरसागर या आमदारांना नोटीस बजावली आहे.