Saturday, May 4, 2024

गॅस सिलिंडर ५०० रूपयात, स्पर्धा परीक्षा शुल्क माफी, शासकीय नोकरीत महिलांना ५० टक्के आरक्षण… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश शरद पवार गटाडून करण्यात आला आहे. यामध्ये गॅस-सिलेंडरच्या दरांपासून महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या मुद्द्यांबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख केला. “शपथपत्रात समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं म्हणणं मांडलं आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून ५०० रुपयांपर्यंत आणल्या जातील. गरज पडली, तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल, जसं पूर्वी यूपीएच्या काळात व्हायचं. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मर्यादेत आणण्याचं काम होईल”, असं म्हणत जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील दोन प्रमुख तरतुदींचा उल्लेख केला आहे.

महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. “देशभरात ३० लाखाच्या आसपास रिक्त जागा आहेत. आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू. महिलांचं शासकीय नोकरीतलं आरक्षण ५० टक्के ठेवण्याचा आग्रह केला जाईल. जीएसटी देशातल्या लोकांना लुबाडण्याचं काम करतोय. त्याला मानवी चेहरा देण्याचं काम आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांच्या भरतीला पायबंद घातला जाईल.जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह धरला जाईल. ५० टक्के आरक्षणाची अट दूर करण्याचा प्रयत्न करू. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसींसाठी आरक्षणाची तरतूद करू. अल्पसंख्याकांसाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम करू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी केला जाईल. तसेच, अग्निवीर योजना रद्द करण्यासाठी काम होईल”, असंही जयंत पाटील म्हणाले.

स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारलं जातं. आमचं सरकार आल्यानंतर ते शुल्क माफ केलं जाईल. महिला शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. महिलांना संसद व राज्य विधिमंडळात तातडीचं आरक्षण देण्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू”, असं ते म्हणाले.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles